जागतिक दृष्टी दिन हा दरवर्षी ऑक्टोबरमहिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो

#जागतिक दृष्टी दिन#LoveYourEyes #WorldSightDay2024जागतिक दृष्टी दिन हा दरवर्षी ऑक्टोबरमहिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो, हा एक जागतिक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश अंधत्व आणि दृष्टीदोषाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. यावर्षी गुरूवार 10 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक दृष्टी दिन हा लहान मुलांनच्या डोळ्यांची काळजी घेण्याबाबत जगाचे लक्ष वेधने आणि मुलांना त्यांच्या डोळ्यांवर प्रेम करण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने साजरा होत आहे. यासाठी प्रभात डोळ्यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने टिळक ग्लोबल स्कूल घनसोली नवी मुंबई येथे शालेय विद्यार्थ्यांसाठीडोळ्यांच्या आरोग्याबाबत माहिती देण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी दिनाच्या औचित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उत्साहाने यामध्ये सहभाग घेतला. डिजिटल स्क्रीनच्या अधिकच्या वापरामुळे डोळ्यांवर होणारे दुष्परिणाम त्याबाबत घ्यावयाची काळजी,आहारामध्ये करण्याचे बदल तसेच खेळआणि अभ्यासाच्या वेळा याबाबतचे मार्गदर्शन नेत्ररोग तज्ञ डॉ.प्रशांत थोरात यांनी केले. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दृष्टी दोषाच्या लक्षणांवर लक्ष ठेवून पालकांना वेळीच अवगत केल्यास वयाबरोबर वाढत जाणाऱ्या चष्म्याच्या नंबरसाठी योग्य वेळी निदान करूनच्या वाढीला प्रतिबंध करणे शक्य शक्य आहे. याबाबतची लक्षणे व त्याची निरीक्षणे यासाठी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर डॉ. वैष्णवी पाटील यांनी विविध खेळांच्या माध्यमातून डोळ्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली.या उपक्रमांतर्गत दिनांक 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत ग्लासेस ऑफ द फ्युचर ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नवी मुंबईतून दहा हजार विद्यार्थी या चित्रकला स्पर्धेत सहभागी होतील असा मनोदय इन मेजर सिटी फाउंडेशनचे श्री सुनील प्रभाकरन यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये टिळक ग्लोबल स्कूलच्या प्राचार्य,प्रशासकीय अधिकारी,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व व्यवस्थापनाचे बहुमूल्य सहकार्य लाभले.माहितीपर खेळांच्या आयोजनासाठी इपका, अँटोड व सनवेज फार्मा कंपनीच्या प्रतिनिधींचा सहभाग लाभला. विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले डोळ्यांचे मॉडेल प्रभातला यांना भेट देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *